जय किसान पूरुष गुप बचत गट सावरी ( बिड ) तर्फे मासिक बैठक व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - दिनांक.०६/१२/२०२० जय किसान पूरुष गुप बचत गट सावरी ( बिड ) तर्फे मासिक बैठक व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेवजी गौरका, उद्घाटक रविंद्र मेश्राम, आदिवासी सोसायटी लिपीक खंडसगी, प्रमूख पाहुणे , सुरेश गरमडे आदर्श शेतकरी व तुळ पिकासाठी त्यांना वसंतराव  नाईक कृषी पुरस्कार मिळालेले शेतकरी , प्रमूख पाहुणे ठकसेन पाटील गुंजव्हान, उपस्थित होते.व कार्यक्रमा निमित्ताने गट एकत्रिकरण व गट एकत्रिकरण कार्यक्रमात महीला व पूरुष असा २५ गटांचा समावेश आहे.जय किसान पूरुष बचत गट अध्यक्ष नथ्थुजी जिवतोडे व पंचफूला जिवतोडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला व आभार प्रदर्शन मंगेश सोनवणे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!