लोक सहभागातून तलाठी कार्यालयाची केली निर्मिती

चिमुर उप विभागीय अधिकारी यांच्या सकल्पनेतून

चिमूर तालुक्यातील अमोल घाटे हे पहिलेच तलाठी

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चिमुर तालुक्यातील मासळ ( बु ) येथे उप विभागीय अधिकारी यांच्या सकल्पनेतून आणि लोक वर्गणीतून सुसज्ज अशा तलाठी कार्यालयाची निर्मिती करण्यात आली. त्यामध्ये तलाटी.सा.क्र.९ चे अमोल घाटे हे तलाटी पहीले ठरले ,उप विभागीय अधिकारी कार्यालय चिमुर च्या दालणात दि.११ सप्टेबर २०२० ला झालेल्या सभेत लोक सहभागातून तलाटी कार्यालयांची निर्मीती हि संकल्पना मांडली होती. त्याच सकल्पना प्रत्यक्षात साकारण्याच्या दृष्टीने प्रयत्न  करुन तलाटी.सा. क्र.९ चे तलाटी अमोल घाटे यांनी लोक सहभागातून मासळ बु येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या पडक्या इमारतीची डागडुगी करून नव्याने तलाटी.सा.९ येथे नव्याने सुसज्ज अश्या कार्यालयाची निर्मिती करण्यात अमोल घाटे हे तालुक्यातील पहीले तलाटी ठरते,असा वक्तव्य संपूर्ण चिमूर तालुक्यात जोरदार सुरु आहे.तलाटी सा. क्र. ९ सुसज्ज कार्यालयाची निर्मीती झाल्याने नागरीकांना तलाटी यांची प्रत्यक्षात भेटी होणार ,नागरीकांची पायपीठ थांबणार असल्याने मासळ बु परीसरात आनंदाचे वातावरण दिसुन आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!