विना परवाना अनधिकृत आर.ओ. प्लॅन्ट बंद करण्यात यावे याकरिता युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत डवले यांनी तहसीलदार तथा नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिले निवेदन
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - दिनांक.१६ डिसेंबर २०२० ला प्रशांत डवले तालुका अध्यक्ष युवक काँग्रेस चिमूर यांचे नेतृत्वात मुख्याधिकारी नगरपरिषद कार्यालय चिमूर तसेच तहसीलदार तहसील कार्यालय चिमूर यांना विना परवाना अनधिकृत आर.ओ. प्लॅन्ट बंद करण्यात यावे. या आर.ओ. प्लॅन्ट च्या नावाखाली दूषित पाणी पुरवठा करून जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या विनापरवाना अनधिकृत आर.ओ.प्लँट मालकांवर कठोर कार्यवाही करणेबाबत निवेदन देण्यात आले.यावेळी निवेदन देतांना शुभम पारखी सोशल मीडिया प्रमुख युवक काँग्रेस विधानसभा चिमूर, प्रज्वल पिसे,अमित मोदी, गणेश संगेल, रुपेश पिसे, अमीर पठाण, अजित वाघमारे आदी युवक काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!