ताडाळा ग्राम पंचायतीवर दोन लाख रूपये भरपायीचा दावा

ताडाळा ग्राम पंचायतीवर दोन लाख रूपये भरपायीचा दावा 

मुल (प्रतिनिधी) 
घरात जाण्यासाठी अडथळा होत असलेले खताचे खड्डे काढण्यात न आल्याने तक्रारी करणाऱ्या तक्रारकर्त्याचे, आकसापोटी, साहित्य जप्त करून, बेकायदेशीर लिलाव करणार्‍या ताडाळा ग्राम पंचायतीवर दोन लाख रूपये भरपायीचा दावा मूलचे दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाखल झाल्यांने, ग्राम पंचायत ताडाळाचे पदाधिकारी अडचणीत आले आहे.  
केवळ आकसापोटी केलेली ग्राम पंचायतीची ही कारवाई आता त्यांचे अंगलट येत असल्यांची चर्चा आहे.
ताडाळा येथे बबन येसोजी जराते, हे महावितरण कंपनीतून निवृत्त झाल्यानंतर, त्यांनी ताडाळा येथील आपले मालकिचे जागेत घर बांधले.  या घरासमोरील सिंचाई विभागाचे जागेत, स्थानिक उपसरपंच राहूल गजानन मुरकुटे यांचेसह अनेकांनी अतिक्रमण करून, खताचे खड्डे खोदले. या सर्वांनी बबन जराते यांचे येण्यां जाण्यांचा मार्ग बंद केला, शेतीकडेही जाण्यांचा मार्ग बंद केला. यामुळे बबन जराते यांनी 2016 आपल्याला न्याय मिळावा यासाठी ग्राम पचांयत, पंचायत समिती, तहसिलदारसह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांचेकडे तक्रारी दाखल केले.  या तक्रारीनुसार, संबधीत अधिका-यांनी, बबन जराते यांचे बाजूने न्याय दिला, मात्र स्थानिक ग्राम पंचायतीच्या पदाधिका-यांनी मात्र प्रशासनाचे आदेश धुडकावित, जराते यांनाच दमदाटी केल्याचा दावा त्यांनी आपल्या पिटीशन मध्ये केला आहे.
बबन जराते यांनी, राजू बाबुराव मुरकुटे, मनोहर लक्ष्मण कोल्हे, काशीनाथ गणू जराते, राहुल गजानन मुरकुटे, शिला वामन दहिवले (सरपंच), करूणा खनके (ग्रामसेवक), विकास भिवा शेंडे, प्रभाकर दिवाकर शेंडे, वैशाली परशुराम सोयाम, मंजूशा विनोद कागदेलवार, जोत्स्ना कवडू यात्तेवार, दिलीप भिवाजी शेंड यांचे विरोधात ही केस दाखल केली आहे.
बबन जराते यांनी केलेल्या तक्रारीवरून त्यांना न्याय देण्यांऐवजी, ग्राम पंचायतीने, उलट, पहिलीच नोटीस ही अंतिम नोटीस असल्यांचे नमुद करून, त्यांचे घरासमोरील साहित्य जप्त केले आणि तातडीने लिलावही करून टाकले. जराते यांनी दोन लाख रूपयाची नुकसान केल्यांचा दावा करून, दोन लाख रूपये भरपाईचा दावा मूलचे कोर्टात दाखल केला आहे.  
उल्लेखनीय म्हणजे, ज्या जागेवरून, बबन जराते यांचे मालकिचे साहित्य जप्त करून, लिलाव केले, ती जागा सिंचाई विभागाची आहे.  या जागेवर अनेकांचे गैरअर्जदारासह अनेकांचे अतिक्रमण असतांनाही, केवळ बबन जराते यांचेच साहित्य जप्त करून लिलाव केल्यांने, गावात ग्राम पंचायतीच्या कार्यपध्दतीबद्दल शंका घेतली जात आहे.  
कोरोणाचे पाश्र्वभूमीवर जमाव करता येत नसतांनाही, ग्राम पंचायत ताडाळा यांनी, अत्यावश्यक नसतांनाही, हेतूपुरस्पर बदला घेण्यांचे भावनेतून लिलाव आयोजीत करून, गर्दी जमविली अशीही चर्चा सुरू आहे.
बबन जराते यांचे बाजूने अॅड. कल्याण कुमार यांनी दावा दाखल केला असून, गैरअर्जदाराची बाजू अॅड. मुरकुटे, अॅड. दाऊद शेख,...... मांडणार आहे. मूल तालुक्यात ग्राम पंचायतीवर भरपायीचा दावा गावक-यांनी दाखल केल्यांची हि पहिलेच प्रकरण असल्यांने या प्रकरणी काय निकाल लागतो, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!