भारत बंदला आम आदमी पार्टीचा पाठिंबा मूल बंदसाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
भारत बंदला आम आदमी पार्टीचा पाठिंबा
मूल बंदसाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
केंद्र सरकार कडून संसदेत शेती विधेयक पारित केल्यापासून संपूर्ण देशात तिन्ही कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करीत आहेत. आतापर्यंत केद्र सरकार कडून या आंदो लनाची दखल न घेतल्यामुळे आता देशातील शेतकरी संघटना राष्ट्रीय पातळीवर दिल्ली मध्ये आंदोलन करीत आहेत. यांच्या मागण्या शेतकरी हिताच्या असून केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विरोधी विधेयक मागे घेण्यासाठी आहेत. त्यामुळे आम आदमी पार्टी मूल तालुका या आंदोलनात पूर्णपणे सहभागी आहे.
केंद्र सरकारने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेवून शेतकरी विरोधी तिन्ही कायदे रद्द करावेत आणि विविध ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर केसेस लावन्यात आल्या त्या मागे घ्याव्या.
आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांनी आंदोलनकारी शेतकऱ्यांना संपूर्ण मदत करीत आहे.शेतकऱ्यांनी उद्या भारत बंदचे आवाहन केले आहे. या भारत बंदला मूल येथिल सर्वपक्षीय पाठींबा दिला आहे, या भारत बंदमध्ये आम आदमी पार्टीही पाठिंबा दर्शविला आहे. मूल बंदला मुलच्या नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आम आदमी पार्टीचे मूल तालुका अध्यक्ष अमित राऊत यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!