दारू माफीया ए.एन. व दारू तस्कर बि.पि.यांची चिमूर तालूक्यात दारू पुरवठा योजना जोमाने सुरू

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - चिमुर तालुक्यामध्ये दारूचा खुलेअाम पणे व्यवसाय सुरू असल्याचे नियमित दिसुन येत अाहे.दारू माफीया A.N. यांचा चिमुर तालूकाच नव्हे तर नवरगाव ,सिंधेवाही,शेगाव,नागभीड , पर्यंत बिधास्त पणे दारू पुरवठा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची खमंग चर्चा चिमुर तालूक्यात सुरू अाहे.या दारू माफीयाला जिल्ह्यावरूनच दारू पुरवठ्याचा आदेश मिळाला अाहे. अशी सुद्धा चर्चा दारू विकणाऱ्या विक्रेत्या कडून होत आहे.म्हणूनच बिनधास्त पणे या दारू माफीयाचा पुरवडा घर पोच होत आहे.तर दुसरी कडे दारू तस्कर B.P. यांची शुध्दा नेरी परीसरात मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा करीत असल्याची चर्चा नेरी परीसरात होत आहे.या दोघाना काही दिवसा अगोदर भिसी पोलीस स्टेशन अंर्तगत अटक करण्यात आली होती.८ ते १० दिवस दारू चा पुरवठा बंध होता पण त्या नंतर दारूचा पुरवठा नियमितपणे जोरात सुरू झाल्यासारखा दिसुन येत आहे.वरूनच पुर्ण पने सेटींग झाल्याची चर्चा होत असून दारूबंदी पथक चंद्रपुर यांनी काही दिवस झलक दाखवली होती पण तेही थंड अवस्थेत बसल्याचे दिसत अाहे.पोलीस स्टेशन चा तर पुर्ण पणे अार्शिवाद दारू माफियांना असतेच म्हणूनच पुरवठा करणाऱ्यांना सहकार्य मिळत असतो.परंतु नवीन पोलीस अधिक्षक , उप विभागीय पोलीस अधिकारी , नवीन पोलीस निरीक्षक , असून सुद्धा अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे अशिही चर्चा मोठया प्रमाणावर रंगू लागली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!