नेरी येथे घराला आग लागून लाखो रुपयांची हानी

पैसे, सोने, रेकार्ड सह सर्व साहित्य जळून खाक

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर ) 

चंद्रपूर : - चिमूर तालुक्यातील नेरी नवरगाव मार्गावर नेरी येथील प्रशांत मधुकर वाघे यांचे घराला  गुरुवारी पहाटे ३ ते ३:३० वाजता दरम्यानच्या सुमारास अचानकपणे लागलेल्या आगीत सम्पूर्ण घरातील आलमारी,त्यातील दस्तऐवज, जवळपास ७० हजार रुपये रोख रक्कम , सोने, चांदीचे दागिने व उदरनिर्वाह सह सर्व साहित्य जळून खाक झाले पहाटेची वेळ असल्याने सर्वत्र नागरिक झोपी असतांना ही गंभीर आग लागल्याने कुटुंबातील सदस्य जागे होऊन नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले पण तात्पुरता स्वरूपात असलेले हे घर  पूर्ण जळून बेचिराख झाले आहे. यात सुदैवाने जीवित हानी टळली असून त्यांनी आपले नवीन घर बांधकाम करणे साठी केलेली जुळवाजुळव यात जळून खाक झाल्याने मोठी नुकसान झाले आहे. सदर ही घटना नवरगाव रोड वरील नानाजी पिसे ले-आऊट मधील आहे.या घटनेची नेरी भाजपा कार्यकर्ते संदीप पिसे व संदेश पंधरे यांनी घटनास्थळी जाऊन आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना माहिती दिली त्यांनीही दूरध्वनीवरून प्रशासनाला तात्काळ माहिती कळवली. व तात्काळ योग्य ती मदत देण्यास सांगितले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!