श्रमिक एल्गारने मिळवून दिला पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना न्याय


श्रमिक एल्गारने मिळवून दिला पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांना न्याय 

चितेगाव ( अमर कड्याम ):-
चंद्रपूर जिल्हातील अनेक तालूक्यामध्ये पाणी पुरवठा विभाग चंद्रपूर कंत्राटदारामार्फत पाणी पुरविण्याचे काम केले जात आहे. यामध्ये टेकाडी, सोनापूर, बेंबाळ, मेंडकी, साखरी, व्याहाड बुज, बोथली, बोरचांदली, येथे पाणी पुरवठाविभाचे फिल्टर प्लॅन्ट असून यावर एकुण 44 कर्मचारी नियमित पाणी पुरवठाचे काम करित आहेत. मात्र कर्मचारी नियमित काम करूनही कंत्राटदाराकडून पगार देण्यास विलंब व अनियमितता होत असल्याने कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन श्रमिक एल्गारचे महासचिव अॅड. कल्याण कुमार यांची भेट घेवून कंत्राटदाराकडून पगार प्रत्येक महिण्यात विलंब व अनियमितता होत असल्याची समस्या मांडली.
यावर अॅड. कल्याण कुमार यांनी कंत्राटदारासोबत कायदेशीर चर्चा करून कर्मचाऱ्यांचे पगार नियमित मिळवून दिले.
कर्मचाऱ्यांचे पगार नियमित मिळवून दिल्याबद्दल पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी श्रमिक एल्गार कार्यालय चितेगाव येथे बैठक घेवून श्रमिक एल्गार संघटनेचे व महासचिव मान.अॅड. कल्याण कुमार यांचे आभार मानले.
याच बैठकीत पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांची कार्यकारणी गठित करून समोरिल ध्येय धोरणे ठरविण्यात आले.
श्रमिक एल्गारचे संघटनसचिव रवि नैताम हे या बैठकीला उपस्थित होते. ही बैठक यशस्वी करण्यासाठी विशाल नर्मलवार, सिंदेवाही तालूका अध्यक्ष संतोश मलकमवार यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!