शेतकरी विरोधी तिनही विधेयके रद्द करून शेतमालाला एम एस पी चे हमी भाव द्या, आम आदमी पार्टीची मागणी.
सिंदेवाही (शांताराम आदे)
भारतातील राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेश शेतकरी / शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांचे विचार विनियम न करता पारित केलेले शेतकरीविरोधी तीनही विधायके रद्द करून शेतमालाला एम एस पी चे हमीभाव द्या, तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिने राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकासह थेट ऑलंपिक पर्यंतच्या क्रीडा प्रकारात देशाचे नाव उज्वल करून भारताचा मान मिळवून दिला, तेव्हा कविता राऊत यांच्यावर झालेल्या अन्यायाची तात्काळ चौकशी व्हावी तसेच पात्रता व शासन निर्णयानुसार तात्काळ शासकीय सेवेत सामावून घ्यावे, याकरिता आम आदमी पार्टीचे विदर्भ सदस्य मनोहर जी पवार तालुका अध्यक्ष शशिकांत बदकमवार तालुका संघटक शांताराम आदे तालुका युवा अध्यक्ष सतीश पवार, हिरालाल जी इंदुरकर शिवम पालकर, चोखोबा वाघमारे व इतर सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!