महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये बैठक संपन्न : महापरिनिर्वाण दिन कोविडच्या नियमांचे व निर्देशाचे पालन करून अभिवादन करावे

महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस स्टेशनमध्ये बैठक संपन्न : महापरिनिर्वाण दिन कोविडच्या नियमांचे व निर्देशाचे पालन करून अभिवादन करावे                
बल्लारपूर :(प्रतिनिधी) 
मागील 9 महिन्यापासून सम्पूर्ण जगभरात धुमाकूळ घालत असलेला कोरोना या विषाणूजन्य आजाराने माणसाला जीवन जगण्याची शिकविले तसेच नियमांचे पालन करण्याचेही शिकविले या अनुषणगाने कोरोना या विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखणे करीता विविध गर्दीचा कार्यक्रमावर बंदी घालणे बाबत मा.जिल्हाधिकारी चंद्रपूर  यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात संचारबंदी लागू असून या दरम्यान मोठ्या प्रमाणात लोकांचा समूह, सार्वजनिक सभा,  कार्यक्रम, मोर्चा, धरणे इ वर बंदी घालण्यात आली आहे यामुळे यावर्षी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ०६ डिसेंम्बर २०२० रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेऊन अत्यन्त साध्या पद्धतीने पार पाडण्यात यावा महापरिनिर्वाण दिन हा भारतीयासाठी दुःखाचा, गामभिर्याचे पालन करावयाचा असून महामानवाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे त्यामुळे कोविड संसर्गाचा विचार करून महापरिनिर्वाण दिनी सर्व अनुयायांनी विचारपूर्वक व धेर्याने वागावे व शक्यतोवर घरूनच महामानवाला अभिवादन करावे या अनुषणगाने पोलीस स्थानकात बल्लारपूर शहरातील  बुध्द विहार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मा.उमेश पाटील पोलीस निरीक्षक, बल्लारपूर यांनी  सूचना दिल्यात तसेच शांततापूर्ण पध्दतीने कोविडच्या नियमाचे पालन करून गर्दी न करता सोशल डिस्टनसिंग चे पालन करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे आवाहन केले आहे या बैठकीला बल्लारपूर शहरातील बुध्द विहार समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ई ची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!