लाखांदूरात भारत बंदला अभूतपूर्व प्रतिसाद
व्यापारी प्रतिष्ठाने व शैक्षणिक संस्था बंद
विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचा पाठिंबा
जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - केंद्र शासनाने पारित केलेल्या कृषी कायद्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, मंगळवारी सकाळ पासून शहरासह ग्रामीण भागातील दुकाने बाजारपेठ व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवल्या. सदरचा बंद ८ डिसेंबर रोजी सकाळपासुनच संपुर्ण तालुक्यात पहावयास मिळाला. या बंदला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
यावेळी भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी विरोधी काळा कायदा रद्द करण्यासाठी संपूर्ण कृषि उपज, व्यापार आणि वाणिज्य (संवर्धन आणि सरळीकरण ) विधेयक २०२०, कृषि (सशक्तीकरण व संरक्षण)किमत आश्वासन आणि कृषि सेवा करार विधेयक २०२०, आवश्यक वस्तु (संशोधन) विधेयक २०२० हे शेतकरी विरोधी ३ कायदे केंद्रशासनाने मंजूर केल्याने कृषि क्षेत्रात खाजगी कारखानदारांचा शिरकाव होवून त्यांची मक्तेदारी निर्माण होईल त्यामुळे शेतकरी देशोधडीला लागेल याविरोधात देशातील जवळपास सर्वच शेतकरी संघटनांनी एल्गार पुकारुण ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली. या बंदला लाखांदुर तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असुन व्यापार्यांनी स्वच्छेने आपापली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून भारत बंदच्या आंदोलनात सहभागी होत शेतकरी विरोधी काळ्या कायद्यांचा निशेध नोंदविला.यावेळी सबंधित पदाधिका-यांनी लाखांदूर नगरात शांतता रैली काढुन सर्व व्यावसायिकांना या बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन केल्याने या बंदला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!