पळसगांव (पि) येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 52 वी पुण्यतिथी साजरी
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगांव(पिपर्डा) : - संपूर्ण जगाला मानवतेची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची 52 वी पुण्यतिथी गुरुदेव सेवा मंडळ व गावकारीच्या वतीने पळसगांव तालुका चिमूर येथे साजरी करण्यात आली.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव धार्मिक महोत्सव व धार्मिक स्थळे यावरील शासनाची कायम असलेली बंदी लक्षात घेऊन गुरुदेव भक्तांनी गावातच कोविड नियमाचे पालन करून गुरुमाऊली वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली.
भजन किर्तनाने कार्यक्रम ला सुरवात झाली रात्रोला भजन संध्या चा कार्यक्रम घेण्यात आला यात गुरुदेव महिला व पुरुष भजन मंडळांनी भाग घेतला होता तसेच २४ डिसेंम्बर ला पहाटे पाच वाजता सामुदायिक ध्यान, व स्वछता अभियान राबविण्यात आले. यावेळी, गावकऱ्यांनी, विशेष करून महिलांनी आपआपल्या घरासमोरील रस्ते स्वच्छ करून, तिथे रांगोळ्या काढल्या होत्या. नंतर वाजता ढोल, ताश्याच्या निनादात भजन आणि देवाचे गाणे म्हणत नाचत गाजत राष्ट्रसंतांच्या पालखीसमवेत गावातून रामधून(फेरी) काढन्यात आली.यानंतर रामधून वर हभप चनफने महाराज व नारायणजी आत्राम महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाले. सरतेशेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना मनोगताद्वारे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. व काला आटोपून महाप्रसादाला सुरुवात झाली.या संपूर्ण कार्यक्रमाला यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गावातील नारायण सगळामे,सुभाष बन्सोड,घनस्याम बन्सोड,सीताराम शेंडे,दुमदेव निकुरे,खुशाल आत्राम,रोशन बमसोड,अशोक सोनेकर, कांशीराम गूळधे,तरुण मंडळी, बालगोपाल, महिलावर्ग, आबाल वृद्ध यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!