का तोडले जाते शाळेचे कुलूप…? पोलिसांत तक्रार,तोडणारे सापडेना,
का तोडले जाते शाळेचे कुलूप…?
बल्लारपूर (वसंत मुन)
बल्लारपूर येथील साईबाबा वार्डातील जनता हायस्कूल डेपो शाखा या शाळेच्या चॅनेल गेटचे कुलूप अधामधात रात्री तोडल्या जात असल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे.तर येथील शिक्षकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.का तोडले जाते कुलूप..? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.पोलिसांत तक्रार दाखल करूनही अद्याप उपद्रवी न गवसल्याने करावे तरी काय असा प्रश्न शाळा प्रशासनाला पडला आहे.
शाळेचे कुलूप तोडण्याची घटना सर्वप्रथम १६ एप्रिल २०२० ला उघडकीस आली.त्यामुळे चॅनेल गेटला कुलूप लावण्यात आले.परंतु १ मे ला पुन्हा कुलूप तोडून उपद्रव करणाऱ्यानीं शाळा प्रशासनाला नव्हे तर पोलीस प्रशासनासला आव्हान दिले.तक्रारी वरून पोलिसांनी पाहणी करून पुन्हा कुलूप लावण्याचा सल्ला दिला. पण,पुन्हा एकदा ५ डिसेंबरला कुलूप तोडण्यात आले.विशेष म्हणजे आतापर्यंत एक डझन कुलूप शाळेच्या सुरक्षेत शाहिद झाले पण पोलिसांना उपद्रवी गवसले नाही.कुलुप तुटल्यानंतर शाळेत दारूच्या शिश्या,कागदी प्याले इ. साहित्य तेथे आढळून येत आहे.म्हणजे विद्यामंदिरचा वापर, मद्यपी मदिरालय म्हणून करीत आहे.जिल्ह्यात दारूबंदी असताना शाळेचे पावित्र्य नष्ट करणारा हा प्रकार थांबविण्यात यावा अशी मागणी शाळेतील शिक्षकांसह परिसरातील नागरिकांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!