लोकअदालतीच्या माध्यमातुन एका दिवसात 3 लाखाची करवसुली

लोकअदालतीच्या माध्यमातुन एका दिवसात 3 लाखाची करवसुली
मूल: (अभिलाष भिमनवार ) 
गावाच्या विकासासाठी शासन निधीसोबतच करवसुलीही महत्वाची आहे, मात्र जनजागृती अभावी अनेक नागरीक करभरणा करीत नाही, यामुळे अनेक वर्षापासुनची थकीत रक्कम नागरीकांकडे असल्याने गावाचा विकास करण्यासाठी ग्राम पंचायतीना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, यामुळे विधी सेवा प्राधिकरण व मूल पंचायत समितीच्या वतिने नुकताच करवसुली करण्याच्या दृष्टीने मूल तालुक्यातील सुमारे 31 ग्राम पंचायतसाठी एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालत ठेवण्यात आले, यालोकअदालतीमध्ये 31 ग्राम पंचायतच्या माध्यमातुन सुमारे 2 लक्ष 93 हजार 567 रूपयाची करवसुली करण्यात आली. याकरवसुलीमुळे गावाचा विकास करण्यासाठी मदत होणार आहे.
तालुक्यात सुमारे 50 ग्राम पंचायत आहे, अनेक ग्राम पंचायत लहान आहेत तर काही ग्राम पंचायत हया गट ग्राम पंचायत आहे, ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या मालमत्ताधारक अनेक वर्षापासुन मालमत्ता व इतर कर भरण्याकडे दुर्लक्ष करीत होते, परंतु ग्राम पंचायतच्या विकासासाठी करवसुल महत्वाची असते. करवसुलीतून अनेक लोकोपयोगी उपक्रम हाती घेतला जातो. याच दृष्टीने विधी सेवा प्राधिकरण व मूल पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने 31 ग्राम पंचायतीसाठी एकाच दिवशी एकाच वेळी लोकअदालतीचे आयोजन केले, यालोकअदालतीमध्ये 243 प्रकरणे ठेवण्यात आली होती, यापैकी 47 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, यातुन सुमारे 2 लाख 93 हजार 567 रूपये कर वसुली करण्यात आली, मागील वर्षीही लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते, सदर लोकअदालतीमध्ये एका दिवसात 476 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, यातुन सुमारे 12 लाख 89 हजार 133 रूपये कर वसुली करण्यात आली, ग्राम पंचायतीचे उत्पन्न वाढ करण्याच्या दृष्टीने सदर करवसुलीचा हा जिल्हयातील मूल पंचायत समितीचा पहिला प्रयोग असून सदर प्रयोग मागील वर्षीपासुन सुरू करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!