अर्धा एकर उसाच्या शेतीतुन 30 हजाराचे उत्पन्न

अर्धा एकर उसाच्या शेतीतुन 30 हजाराचे उत्पन्न 

मुल (प्रतिनिधी) 
मूल तालुक्यातील मौजा कोसंबी येथील शेतकरी सुधाकर चैधरी यांना धानपिकाच्या शेतीतून पाहिजे त्याप्रमाणात उत्पन्न होत नसल्याने यावर्षी अर्धा एकर शेतामध्ये त्यांनी उसाची शेती केली असून त्यांना उसाच्या शेतीतून 30 हजाराचे उत्पन्न झाले.
मूल पासुन 4 किमी अंतरावर असलेल्या कोसंबी येथील सुधाकर चैधरी यांचेकडे 3 एकर शेती आहे, दरवर्षी त्यांनी शेतात धानपिकाची लागवड करतात, मात्र धान लागवडीपासून त्यांना पाहिजे त्याप्रमाणात उत्पन्न होत नसल्याने यावर्षी त्यांनी केवळ अर्धा एकर शेतात उसाची शेती करावी अशी कल्पना सुचली. आणी त्यांनी शेतात मशागत केली, यासाठी त्याना 10 हजार रूपयाचे खर्च आला. कमी दिवसात चांगले उत्पन्न झाल्याने सुधाकर चैधरी यांनी धानपिकापेक्षा उस लागवड केव्हाही फायदेशीर असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. उत्पन्न घेतलेल्या उसाची बाजारपेठ मूल येथेच असल्याने त्यांना विकण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागले नाही असेही चैधरी यांनी सांगीतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!