शेतकऱ्याने बोंड अळी लागल्यामुळे कापूस पिकाला केले उध्वस्त
सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )
सावरी (बिड) : - सावरी (बी) येथील अल्प भूधारक शेतकरी मुरलीधर नथ्थुजी रामटेके यांनी शेतातील पिकाला गुलाबी बोंड अळी लागल्यामुळे कापूस पिक उध्वस्त केले असून सावरी येथील अल्प भूधारक शेतकरी मुरलीधर नथ्थुजी रामटेके यांच्या कडे ३ एकर शेती आहे ,त्या ३ एकर शेती मध्ये सोयाबिन,धान व कापूस या सारखें पिक नेहमीच घेतात पण या वर्षी सोयाबिन पिकाला कंरपा रोग लागला व धान पिक अवकाळी पावसामुळे जमिन उध्वस्त झाले. मुरलीधर नथ्थुजी रामटेके यांनी काही दिवसांपूर्वी धान पिकाला आग लावली होती.पण एका संकटातून बाहेर पडत नाही तर शेतकऱ्यांवर दुसरें संकट तयार होते कापूस पिकाला लागलेली गुलाबी बोंड अळी तरी या सर्व संकटांची शेतकरी मुरलीधर नथ्थुजी रामटेके कसे लढले असा ? प्रश्न आहे या शेतकऱ्यांच्या हातून सर्व पिक निघुन गेले आहे तरी या शेतकरी राजावर वर कर्जचा पाहाळ कोसळला आहे तरी शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकरी मुरलीधर नथ्थुजी रामटेके यांना आर्थिक मदत मिळणार काय ? याकडे मुरलीधर नथ्थुजी रामटेके या शेतकरी बांधव वाचे लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!