मुल येथे महात्मा फुले समता परिषदेचा वर्धापनदिन साजरा सामाजिक कार्यकर्ता व गुणवंतांचा सत्कार

मुल येथे महात्मा फुले समता परिषदेचा वर्धापनदिन साजरा         

सामाजिक कार्यकर्ता व गुणवंतांचा सत्कार


मूल :( प्रमोद मशाखेत्री) 

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिनांक 1 नोव्हेंबर ला महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ओबीसींचे राष्ट्रीय नेते ना.छगन भुजबळ यांनी स्थापन केलेल्या समता परिषदेचा 28 वा वर्धापन दिन मूल येथे सायंकाळी 6 वाजता साजरा करण्यात आला.  हा कार्यक्रम समता परिषद चंद्रपूर (पूर्व)चे जिल्हाध्यक्ष प्रा.विजय लोनबले यांच्या नेतृत्वात व  संयोजनात घेण्यात आला .  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केवलराम  कऱ्हाडे  हे होते.सत्कारमूर्ती म्हणून सामाजिक कार्यकर्ते डॉ.रामचंद्र दांडेकर व  प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते नामदेवराव गावतुरे ,महिला आघाडी कार्याध्यक्षा शशिकला गावतुरे , रयत नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष निपचंद शेरकी, समता परिषद चंद्रपूर (पूर्व) चे  जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सामाजिक क्रांतीचे अग्रदूत क्रांतिसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन ,दीपप्रज्वलन व पुष्पमाला अर्पण  करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गंगाधर  कुनघाडकर यांनी केले केले. कार्यक्रमाचा उद्देश समता परिषद चंद्रपूर (पूर्व ) चे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी विषद केला.त्यांनी ना.छगन भुजबळ यांनी समता परिषद ,ओबीसी व बहुजन समाजासाठी  केलेल्या  कार्याची उपस्थितांना माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान गेल्या साठ वर्षापासून  ग्रामीण भागात गरिबांना  वैद्यकीय सेवा देणारे व  सेवाव्रती  जीवन जगणारे सामाजिक कार्यकर्ते  डॉक्टर रामचंद्र दांडेकर व दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व स्पर्धा परीक्षा व महामानवांची  पुस्तके  भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थिनी लावण्या प्रशांत  लाडवे, स्नेहल राजेंद्र पाठक ,प्रतीक अनंत लेनगुरे यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित 30 विद्यार्थ्यांना महामानवांची प्रेरणादायी  पुस्तके  भेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्कार मूर्ती डॉ. रामचंद्र दांडेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत कर्मवीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केवलराम कऱ्हाडे  यांनी केले. त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पुस्तकाचे महत्त्व समजावून सांगितले. सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व तरुण मुले  वापर  करीत असल्यामुळे पुस्तक वाचनाकडे  दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पुस्तक वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक आहे असे विचार त्यांनी  मांडले. कार्यक्रमाचे संचालन युवराज चावरे  यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा सहसंघटक  ईश्वर लोनबले यांनी मानले. कार्यक्रमाला क्रांतीज्योती पतसंस्था मूल चे अध्यक्ष गुरुदास गुरनुले, प्रा.किसन वासाडे, तौसिफ सय्यद, युवा अध्यक्ष राकेश मोहूर्ले, जिल्हा महिला आघाडी सहसचिव प्रा. अर्चना चावरे ,सीमा लोनबले, प्रा. राजेश्‍वर राजूरकर, प्रा. गुलाब मोरे,प्रा.प्रभाकर धोटे,प्रा.धनंजय चुदरी , दलित जनबंधू ,प्रशांत भरतकर,विनोद आंबटकर,पुरुषोत्तम कुनघाडकर,विजय नागोसे ,आकाश निकुरे, दुशांत महाडोळे, प्रतीक गुरनुले आदी उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!