मूल येथे ओबीसी समाज समन्वय समितीची स्थापना

मूल येथे ओबीसी समाज समन्वय समितीची स्थापना
मूल :( प्रमोद मशाखेत्री)                              ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून पुढील दिशा  ठरविण्यासाठी ​रविवार दिनांक 1 नोव्हेंबर ला दुपारी 1 वाजता   मूल येथील पंचायत समितीच्या  प्रांगणात ओबीसी समाज बांधवाची बैठक पार पडली. 
 बैठकीत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेत ओबीसींसाठी  स्वतंत्र रकाना तयार कसरून जनगणना करावी असा ठराव पारीत केला. व जिल्हायाचे पालकमंत्री विजय वडेटीवार यांनी ओबीसी समाजाबाबत ठाम भूमिका मांडल्याबदल त्यांचे ठाळया वाजवून अभिनंदन करण्यात आले.
 तालुक्यात ओबीसी समाजाची चळवळ मोठया प्रमाणात राबविल्या जाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात एकेवीस जणांची तालुकास्तरीय ओबीसी समाज समन्वय समिती निर्माण करण्यात आली. संजय मारकवार ,मंगेश पोटवार,चंदू मारगोनवार,कैलाश चलाख,आणि संतोष शनगरवार यांची समितीचे मुख्य नियंत्रक म्हणून एकमताने निवड करण्यात आली. सभेत ओबीसी समाजाच्या पुढील आंदोलनावर चर्चा करताना उपस्थितांनी भविष्यात येणारे संकट टाळण्यासाठी ओबीसी समाजाने संगठित होवून लढा पुकारणे महत्वाचे असल्याचे मत व्यक्त केले. न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी येत्या 3 नोव्हेंबर रोजी स्थानिक गांधी चौक येथून ओबीसी समाजाचे कार्यकर्ते तहसील कार्यालय येथे रॅलीव्दारे येवून मागण्यांचे निवेदन देण्याचे ठरले. 
 त्यामूळे येत्या 3 नोव्हेबर रोजी दुपारी 12.30 वाजता ओबीसी समाज बांधवांनी मूल येथील गांधी चौकात मोठया संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले.
  सभेचे संचालन लक्ष्मण खोब्रागडे  यांनी केले. जितेंन्द्र बल्की यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेत  नगरसेवक प्रशांत समर्थ,विनोद कामडे, चंद्रकांत आष्टणकर ,तालुका संघटक युवराज चावरे ,गंगाधर कुनघा डकर ,प्रा.विजय लोनबले ,संजय पडोळे ,गुरुदास गुरनुले ,जितेंद्र लेनगुरे ,सुधाकर चरडुके,भगवान  चन्नावार, संजय पुप्पलवार यांचेसह विविध क्षेत्रात कार्य करणारे ओबीसी समाजबांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!