बल्लारपूरातील अनेक ठिकाण सीसीटीव्ही च्या नियंत्रणाखाली

बल्लारपूरातील  अनेक ठिकाण सीसीटीव्ही च्या नियंत्रणाखाली        

बल्लारपूर.  धनंजय  पांढरे        
बल्लारपूर शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असून अनेक अशी प्रशस्त इमारते उभी राहत असून प्रशासन व नागरिकांच्या दृष्टीने उपयोगात येणारी अनेक कार्यालय सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आली आहेत महसूल प्रशासनाचे कार्यालय म्हणून उपविभागीय अधिकारी कार्यालय व तालुका दंडाधिकारी कार्यालय सीसीटीव्ही च्या नियंत्रणाखाली असून या कार्यालयात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे कार्य या माध्यमातून करण्यात येते.
त्याच प्रमाणे ग्रामीण भागाची लोकवाहिनी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस चे बल्लारपूर बस स्थानक सुध्दा सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आहे मग ते एसटी बस येणारा मार्ग व जाणारा मार्ग, तसेच वाहनांची पार्कींग शिवाय बसस्थानकावर येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्याचे कार्य या द्वारे करण्यात येते.
बल्लारपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कार्य पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येणारे पोलीस स्थानक सुध्दा सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आहे.
त्याचप्रमाणे दळणवळणाचे महत्वपूर्ण साधन म्हणून ओळखले जाणारे रेल्वे स्थानक सुध्दा सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असून येथील 1 ते 5 प्लेटफॉर्म वर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले.
आहेत तसेच रेल्वेस्थानक परिसरातील पार्किंग पासून तर तिकीट काउन्टर सुध्दा सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली आहे जवळपास बल्लारपूर शहरातील अनेक कार्यालयात सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली येणार असून बल्लारपूर शहरातील अनेक मुख्य महत्वपूर्ण  ठिकाणी सीसीटीव्ही लागणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!