बल्लारपुर मित्र मंडळ तर्फे एक दिवसीय स्वच्छता अभियान
बल्लारपुर मित्र मंडळ तर्फे एक दिवसीय स्वच्छता अभियान
बल्लारपुर : (धनंजय पांढरे)
दिवाळीच्या पावन पर्वावर स्वच्छच तेचें निमित्य साधून बल्लारपुर मित्र मंडळ तर्फे शहरातील प्रतिष्टीत नागरिक व युवकांनी व महिलांनी वर्धा नदी चा काठी गणपती घाट येथे सकाळी सहा वाजे पासून स्वच्छता अभियान केले घाटावरील कचरा व रानटी झुडुपे, प्लास्टिक पिशव्या अन्य कचऱ्याची विल्हेवाट लावली. या सफाई अभियानात बऱ्याच प्रतिष्टीत युवकांनी दिवाळीच्या सुट्टीत सहभाग घेतला. शहरात मागील अनेक वर्षे पासून नगर परिषद च्या वतीने स्वच्छता मोहीम राबविली जात आहे त्यात विविध संघटना, संस्था, असोसिएशन यांचा सहकार्याने बल्लारपुर शहराला स्वच्छते मध्ये पारितोषिक मिळविण्यासाठी सहकार्य लाभले. बल्लारपुर मित्र मंडळ ने दिवाळीच्या पर्वावर सफाई अभिमान करून एक अभिनव कार्याची प्रचिती दिली या मध्ये अनेक तरुण मंडळी नि भाऊसाहेब येगीनवार यांचा संकल्पना ने सकाळी सहा वाजेपासून स्वच्छता अभियान राबवून गणपती घाट स्वच्छ केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!