चंद्रपुरात आय टक चा सुवर्ण शताब्दी महोत्सव थाटात संपन्न

ज्येष्ठ कामगार नेते व कार्यकर्ते 20 मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन केला सत्कार

राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - आल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस अर्थात आय टक ही भारतातील सर्वात मोठी व पहिली कामगार संघटना हिला 31 आक्तोंबर 2020 रोजी 100 वर्ष पूर्ण झाल्याने सुवर्ण शताब्दी महोत्सव समारोह वर्षानिमित्त चंद्रपूर जिल्हा आय टक कौन्सिल च्या वतीने एम.एस. ई.बी.वर्कर्स फेडरेशन सोसायटी हाल मध्ये कॉ.संतोष दास जिल्हा कार्याध्यक्ष आय टक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा मेळावा व ज्येष्ठ कामगार नेते,कार्यकर्ते यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात लाल झेंडा फडकवून करण्यात आली व त्या नंतर सर्व कामगार दिव्यांगत नेत्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी मंचावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य कर्मचारी संघटनेचे जिल्हा महासचिव रमेश पिंपळ शेंडे,संयुक्त खदान मजदुर संघांचे महासचिव कॉ.सी जे जोसेफ, कॉ.श्रीनाथ सिंग,आय टक जिल्हाध्यक्ष कॉ.दिलीप बर्गी, भाकप चे जिल्हा सचिव कॉ.प्रा.नामदेव कनाके, एम.एस. ई.बी.वर्कर्स फेडरेशन चे केंद्रीय उपाध्यक्ष कॉ.प्रकाश वानखेडे, कॉ.गुणवंत दडमल,मजदुर युनियन भद्रावती चे नेते कॉ.डी. एच.उपासे, आय टक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे, कॉ.राजू गैनवा र माजी नगसेवक,शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष वनिता कुंठा वार,श्रीधर वाढई,कुंदा कोहपरे,सुलोचना उराडे, आशा वर्कर व गट प्रवर्तक महिला संघटनेच्या जिल्हा सचिव कॉ.ममता भिमटे,प्रतिमा कायारकर,सविता गटलेवार,संयुक्त खदान मजदुर संघाचे एरिया अध्यक्ष कॉ.प्रदीप चीताडे, कॉ.अजय इशवरकर यासह आदी मान्यवर उपस्थित होते.या सर्व कामगार नेत्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना कॉ.सी.जे.जोसेफ म्हणाले , आय टक या केंद्रीय कामगार संघटनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत,हा आनंदाचा क्षण असून संघर्ष,त्याग व बलिदानाचा इतिहास असून साम्राज्यवादी शक्तींना नेस्तनाबूत करण्याचा , स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची भूमिका बजावत आय टक नी कामगारांसाठी सरकारला अनेक कामगार कायदे करण्यास भाग पाडले आहे.आज देशभरात आय टक संलग्न चार हजार संघटित,असंघटित कामगार,कर्मचारी संघटना असून दीड कोटी कामगार सभासदं संख्या आहे . अशा या संघटनेच्या इतिहासाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.लाला लजपत राय,सुभाषचंद्र बोस,पंडित जवाहरलाल नेहरू, कॉ.एस. ए.डांगे,इंद्रजित गुप्ता, ए.बी.बर्धन,गुरुदास दासगुप्ता,असे मातब्बर नेते या संघटनेचे अध्यक्ष व महासचिव राहिले आहेत .राज्य कर्मचारी संघटनेचे नेते मा.पिंपळ शेंडे म्हणाले देशभरात सर्व कामगार वर्गाला न्याय देण्याचा काम आय टक संघटनेची केला असून,इतर सर्व केंद्रीय कामगार संघटना यांना एकत्र करून कृती समिती तयार करून केंद्र सरकारच्या कामगार व किसान विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी सातत्याने संघर्ष सुरू आहे  तसेच या मोदी सरकार ची  कामगार विरोधी कुठणीती हाणून पाडण्यासाठी सर्वांची एकजूट कायम करून येत्या 26 नोव्हेंबर 2020 रोजी केंद्रीय संघटनेच्या निर्देश नुसार  देशव्यापी संप शंभर टक्के यशस्वी करण्याचे आवाहन आजच्या मेळाव्यात करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक कॉ.विनोद झोडगे तर आभार प्रदर्शन कॉ.राजू गैनवार यांनी मानले.यावेळी जिल्हाभरातील आय टक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!