बल्लारपूर पाणी पुरवठा योजना ऑगस्ट 2020 पर्यंत 89.27 लक्ष रु तोट्यात : सर्वसामान्य नळ ग्राहकासह, नगर परिषद बल्लारपूर कडे थकबाकी

बल्लारपूर पाणी पुरवठा योजना ऑगस्ट 2020 पर्यंत 89.27 लक्ष रु तोट्यात : सर्वसामान्य नळ ग्राहकासह, नगर परिषद बल्लारपूर कडे थकबाकी            


 बल्लारपूर : ( वसंत मून)  
बल्लारपूर शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण द्वारे शुध्द पाण्याचा पाणी पुरवठा करण्यात येतो याकरिता वीज देयक, पी.एस.सी पावडर, क्लोरीन गॅस, पाईपलाईन गळती व दुरुस्ती व कर्मचारी वर्गाचा एकूण वार्षिक खर्च अंदाजे 5 कोटी पर्यंत येत असतो मात्र प्रत्यक्षात वसुली मात्र 3 कोटी ही होत नाही त्यामुळे प्रत्येक वर्षी नळ योजना ही तोट्यात येत असते.पाणी पुरवठा विभागाच्या माहिती नुसार मार्च 2020 पर्यंत घरगुती नळ ग्राहकांवर 19.93 कोटी, तर नगर परिषद बल्लारपूर कडे 9.80 ,कोटी रु ची थकबाकी झालेली आहे.
बल्लारपूर पाणी पुरवठा योजने अंतर्गत बल्लारपूर शहरात 9100 नळ ग्राहक आहेत पाणी पुरवठा विभागाद्वारे मिळालेल्या माहिती नुसार ऑगस्ट 2020 पर्यंत 89.27 लक्ष रु तोट्यात असल्याची माहिती आहे.विशेष बाब म्हणजे बल्लारपूर शहर वासीयांना कोरोना संक्रमण काळात व उन्हाळ्यात सुध्दा पाणी पुरवठा विभागाद्वारे शेवटच्या दिवसापर्यंत नियोजन करून अखंडीत शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात आला मात्र 60% नळ ग्राहक पाण्याचा उपभोग घेऊन सुध्दा नळ देयक वेळेवर भरतांना दिसून येत नाही.
त्यामुळे प्रत्येक महिन्यात नळ योजना तोट्यात येत आहे करिता सर्व नळ ग्राहक व संस्था यांना आवाहन करण्यात येते की त्यांना देण्यात आलेले देयक अंतिम तारखेच्या आत भरावे तसेच सर्व थकबाकीदार नळ ग्राहकांना ही आवाहन करण्यात येते की त्यांनी आपली थकबाकी भरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सहकार्य करावे अन्यथा नाईलाजाने त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपविभागीय अभियंता, श्री सुशील पाटील, उपविभाग बल्लारपूर यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!