प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा

जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य शाखा भंडारा जिल्ह्याच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिन १६ नोव्हेंबर २०२० रोजी निसर्ग रमणीय पर्यटन स्थळ रावनवाडी, शासकीय वन व्यवस्थापन समिती येथे आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त वृक्षारोपन व कोरोना योद्धांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी "कोरोना योद्धा २०२०" हा सन्मान सरपंच तथा अध्यक्ष जगदीश उईके यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. सदर कार्यक्रम संस्थापक अध्यक्ष डी. टी.आंबेगावे यांच्या आदेशान्वये, राज्य उपाध्यक्ष, पंकज वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली, विदर्भ सरचिटणीस प्रा.शेखर बोरकर यांच्या नेतृत्वाखाली, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे,भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने ,जिल्हा कोषाध्यक्ष प्रवीण भोंदे, तालुका अध्यक्ष प्रशांत शहारेआदी पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!