बुद्धिष्ट महिला मंडळांच्या वतीने गुणवंतांचा सत्कार.
बुद्धिष्ट महिला मंडळांच्या वतीने गुणवंतांचा सत्कार.
मूल (प्रकाश चलाख)
मुल येथील बुद्धिष्ट महिला मंडळाच्या वतीने नुकताच (दिनांक १०/११/२०२०) चालू सत्रातील दहावी, बारावी मार्च 2020 च्या परीक्षेत विशेष प्राविण्यासह यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ताडाळा रोड येथील बोधिसत्व बुद्ध विहारात पार पडला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारती कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून हिरालाल भडके, प्रा. कातकर, डॉ गिरीधर तागडे, रत्नमला दुर्गे, वनमाला चाटे, ज्ञानी ताई मेश्राम, अलकाताई दुपारे, मृणाली निमगडे आदी मंचावर उपस्थित होते.
यावेळी हिरालाल भडके यांनी विद्यार्थी जीवनावर प्रकाश टाकताना म्हटले की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दहावीची परीक्षा पास केली तेव्हा समाजाने त्यांचा सत्कार केला होता. त्या सत्काराची जाणीव ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाचाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाचे उद्धार केला. त्याचप्रमाणे आपण विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या सत्काराची जाण ठेवून समाजासाठी काम केले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.
तर रत्नमला दुर्गे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्यात जि प प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे फार मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना घडविणे ही केवळ शिक्षकांची जबाबदारी नसून त्यांच्या पालकांची सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे त्यांना सामाजिक जाणीव निर्माण करून त्यांना स्टेज पर्यंत पोहोचविण्याचा काम प्रतिक दुर्गे व तन्मय उराडे यांच्या पालकांनी केले असे गौरवोद्गार भारती कांबळे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन संध्याताई भोसले तर प्रास्ताविकेतुन सुनीता खोब्रागडे यांनी बुद्धिष्ट महिला मंडळाच्या कार्याची माहिती सांगितले. तर उपस्थितांचे आभार उषाताई दुर्ग यांनी मानले.यावेळी covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बुद्धिष्ट महिला मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!