लाखांदूर तालुक्यातर्फे तिघाडी सरकारचा जाहीर निषेध

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - महाराष्ट्र सरकार जागे व्हा महिलांवरील अत्याचार व विनयभंगाचे सत्रथांबविण्यास              महाविकास आघाडी सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे,म्हणून माननीय तहसीलदार यांना निवेदन देऊन महाराष्ट्र सरकार चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा लाखांदूर तालुका तर्फे सर्व महिलांनी कोरोना महामारी नियम मास्क व सोशल डिस्टंसिंग चे पालन करुन निषेध नोंदविला बलात्कार विनयभंग आणि महिलांवर होणारे अत्याचारात दिवसेंदिवस वाढ होत आहे,कुठे चिमुकलीवर बलात्कार करून मारण्यात येत आहे तर कुठे अमानुषपणे तिला जाळण्यात येत आहे.आपल्या राज्यात घडत असलेल्या या अमानवीय घटनांचा निषेध करण्यात आला भारतीय जनता महिला आघाडी लाखांदूर तालुक्यातर्फे कडून तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले. त्यात महिला आघाडी चे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!