नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करणे,पिक हानी व जीवीताची नुकसानभरपाई मिळण्यासाठी आम आदमी पार्टी चे धरने आंदोलन.
नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करणे,पिक हानी व जीवीताची नुकसानभरपाई मिळण्यासाठी आम आदमी पार्टी चे धरने आंदोलन.
राजूरा :(प्रतिनीधी)
नरभक्षक वाघाची दहशत, पिकहानी व आर्थिक मदत याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व सरकारी धोरणाचा विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टी शाखा राजरा च्या वतीने दि.१४/१०/२०२० ला धरने आंदोलन दुपारी १२.००ते ३.०० दरम्यान राजुरा तहसिल कार्यालया समोर तालुकाध्यक्ष रोशन येवले यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे.यावेळी आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे, संघटनमंत्री परमजीतसिंग झगडे, कोषाध्यक्ष भिवराज सोनी,जेष्ठ सदस्य मिलिंद गड्डमवार आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत होणार आहे.तरी जास्तीत जास्त लोकांनी यात सहभाग नोंदवावा आणि आपले समर्थन दर्शवावे असे आव्हाहन व विनंती आम आदमी पार्टी शाखा राजुरा च्या वतीने करण्यात आलेले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!