स्पंदन गांधी बोरकर शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र

स्पंदन गांधी बोरकर शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र



      
           वरोरा : (प्रतिनिधी) 
शासकीय परिक्षा परिषद पुणे , पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5 वी आयोजित फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आलेला असून शिष्यवृत्ती परीक्षेत वरोरा येथील सेन्ट अॅनिस हायस्कूल मधिल इयत्ता 6 वी चा विद्यार्थी स्पंदन शालिनी गांधी बोरकर यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्यसह यश प्राप्त केलेले आहे. विशेष म्हणजे स्पंदन ची नवोदय विद्यालय बाळापुर तळोधी येथे प्रवेशासाठी सुध्दा निवड झालेली आहे. स्पंदन ने संपादित केलेल्या घवघवीत यशाबद्दल सेन्ट अॅनिस हायस्कूल चे मुख्याध्यापक, शिक्षक वूंद, मित्र परिवार तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले आहे. स्पंदन ने त्याच्या यशाचे श्रेय आजी अनुसयाबाई वाघमारे , मुख्याध्यापक , सर्व शिक्षक वूंद आणि आईवडिलांना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!