प्रफुलभाई पटेलजी यांच्या कडून जिल्हाधिकारी मार्फत जिल्हा सामान्य रुग्णालयाला रेमदेसिव्हर इंजेक्शन ची दुसरी खेप आज दिनांक.१२/१०/२०२० ला सांयकाळी दिली

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश झाडे )

भंडारा : - भंडारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा संसर्ग मोठया जोमाने वाढत आहे. रुग्णाच्या संख्येत मोठ्या  झपाट्याने वाढ झालेली आहे. या गंभीर आजारमुळे मरणाऱ्यांच्या  संख्येत सुद्धा वाढ होत चाललेली आहे. मागच्या महिन्यात भंडारा  जिल्ह्यात  रेमडेसिव्हर इंजेक्शनचा  शासकीय  रुग्णालयात  व  बाजारपेठेत  तुटवडा  होता. भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून आणि आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी प्रफुलभाई पटेल सोबत आरोग्य मंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख,  वैद्यकीय  शिक्षण मंत्री अमित देशमुख जिल्हयाचा दौऱ्यावर आलेले होते त्यावेळी मा. प्रफुलभाईं पटेल यांनी रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा बघता  भंडारा जिल्हाल्या रेमडेसिव्हर इंजेक्शन आपल्या कडून देण्याची घोषणा केली होती व त्या घोषणेची पुर्तता अंमलबजावणी करीत रेमडेसिव्हर इंजेक्शन दि. २६/०९/२०२० शनिवार ला जिल्हा सामान्य् रुग्णालय भंडारा यांना जिल्हाधिकारी  भंडारा यांच्या मार्फत देण्यात आले. तसेच आज दि.१२/१०/२०२० रोज सोमवारला प्रफुलभाई पटेल यांच्याकडून रेमडेसिव्हर इंजेक्शन दुसरी खेप जिल्हाधिकारी भंडारा मार्फत Civil Surgeon खंडते जी व जिल्हा आरोग्य अधिकारी प्रशांत उके  जिल्हा सामान्य रूग्णालयाला देण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, माजी खासदार मधुकर कुकडे, प्रदेश महासचिव धनंजय दलाल, ॲड.विनयमोहन पशिने, यशवंत सोनकुसरे, हेमंत महाकाळकर, गणेश चौधरी,  इत्यादी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!