सिंदेवाही येथील शिवभोजन ठरत आहे गरीब व गरजू लोकांचा मुख्य आधार
सिंदेवाही येथील शिवभोजन ठरत आहे गरीब व गरजू लोकांचा मुख्य आधार
सिंदेवाही :( निकेश वेटे)
महाराष्ट्रातील महायुतीच्या काळात अख्ख्या महाराष्ट्रातील जिल्हा व तालुक्यात शिवभोजन थाळी ची योजना अमलात आणली आहे.प्रत्येक तालुक्यातील खेडेगावातून तहसील व पंचायत समिती मध्ये कामासाठी येणारे गावातील मजूर, गोरगरीब लोकांसाठी शिवभोजन थाळी चा खूप मोठा आधार म्हणून लाभलं आहे. या शिवभोजना मध्ये अवघ्या ५ रुपयांचा जेवण मन तृप करणार आहे. रोज वेगवेगळी भाजी असणार, व या शिवभोजन मध्ये असणारी स्वछता, नेहमी स्वच्छ तेची काळजी घेऊन जेवण बनविणारे कर्मचारी वर्ग लाभार्थ्यांना गरम व ताज जेवण देण्यासाठी नेहमी कार्य करणारे शिवभोजन चे प्रोमोटर या मुळे इथे जेवण करणारे व्यक्ती आनंदाने जेवण करण्यासाठी येत असतात, आज ५ रुपयात साधा नाश्ता पण मिळत नाही,पण शिवभोजन मध्ये मन जोगे वरण, पोळी,भात व वांग्याची भाजी,आलुची भाजी,चणा वटाना व पाटोडीच्या भाजीचे चवदार जेवण मिळत आहे. लाभार्थी लोकांना जेवण हे लोकांच्या आवडीनुसार चविष्ट बनविण्याची विशेष काळजी प्रोमोटर वर्ग घेत आहे म्हणूनच आज सिंदेवाही तालुक्यात येणार ग्रामीण भागातील व्यक्ती या शिवभोजन चा आस्वाद घेतातच. व आज तालुक्यातील सर्व गावात या शिवभोजन मधील जेवणाची चर्चा होत असताना दिसत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!