जवाहर नवोदयचा परीक्षा फॉर्म भरा 15 डिसेंबर पर्यंत

जवाहर नवोदयचा परीक्षा फॉर्म भरा 15 डिसेंबर पर्यंत

मूल (प्रमोद मशाखेत्री) 

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी अर्ज करण्याची प्र​क्रिया आॅनलाईन प्रक्रियेतून सोपी केली आहे. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षा 2021 साठी डेस्कटॉप,लॅपटॉप,मोबाईल,टॅंबव्दारे अर्ज भरावेत,असे आवाहन प्रमोद मशाखेत्री यांनी केले आहे.
  जवाहर नवोदय विद्यालयाच्या वतीने 2021—22 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता सहावी प्रवेशाकरीता
निवड परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
 विद्यार्थी हा  जिल्हयातील शासनमान्य शाळेमध्ये इयत्ता पाचवी मध्ये शैक्षणिक वर्ष 2020—21 मध्ये शिकत असावा.विद्याथ्र्याचा एक मे 2008 पूर्वी व 30 एप्रिल 2012 नंतर जन्म झालेला नसावा. 
सन 2018—19,2019—20,2020—21, मध्ये विद्यार्थी तिसरी,चौथी,पाचवी अनुक्रमे खंड न पडता उत्तीर्ण झाला पाहीजे.
 अनुसुचित जाती,जमाती,आणि सर्व मुली,अपंग संवर्गासाठी व इतर मागासवर्गासाठी जागा राखीव आहेत. तसेच तृतीय पंथीय उमेदवार सुध्दा नवोदय विद्यालयाच्या निवड चाचणी साठी अर्ज करू शकतात. 
  कागदपत्र : स्वताचा फोटो,सही,पालकाची सही,शाळेतील सर्टिफीकेट, माध्यम : — मराठी,इंग्रजी
 नवोदय विद्यालय समिती या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी त्वरीत आॅनलाईन फॉर्म भरावेत असे आवाहन सामाजिक कार्यकर्ता मशाखेत्री यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!