किडींमुळे धानपिकाची नासाडी शासन आर्थाीक मदत करणार काय
मूल : (प्रमोद मशाखेत्री )
तालुक्यात सुरूवातीपासून पावसाने दगा दिला. त्यातच आता धान निसवा अवस्थेत असताना पिकावर विविध किड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. हातात आलेल्या धानपिकाची पुर्णत: तणस झाले आहे. हातात आलेल्या धानपिकाची पूर्णत: तणस झाले आहे. त्यामूळे शेतकरी हवालदिल झाले आहे.
शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतक—यांना केली आहे.
मूल परिसरात यावर्षी सुरूवातीपासून पावसाने दगा दिला यातच कसेबसे शेतक—यांनी धानाची रोवणी केली.धानपीक जोमात व निसवा अवस्थेत असताना खोडकिडा,मावा,तुडतुडा यासारख्या रोगांनी धानपिकावर आक्रमण केले. हातात आलेला पीक वाचविण्यासाठी शेतक—यांनी महागडया औषधाची फवारणी केली.मात्र काही उपयोग झाला नाही. शेतातील धानपिक रोगामूळे व अवकाळी पावसाने पुर्णपणे नष्ठ झाले.
मूल येथील चिचाळा या गावातील संदीप दादाजी लेनगुरे हे शेतकरी असून 2 1/2 अडीच एकर शेतात धानाची रोवणी केली. धान कापणी योग्य असताना मावा तुडतुडा रोगामुळे धानपीक नष्ठ झाले. ऐन निसव्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने हातात आलेले पीक पूर्ण पणे नष्ट झाले.
त्यामुळे जगायचे कसे असा प्रश्न सध्या शेतक—यांना पडला आहे. त्यामुळे शासनाने त्वरित नुकसान भरपाई देवून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतक—यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!