साखरा घाटावरून रेतीची अवैध उत्खनन करून चोरी

आंतर जिल्हा रेती तस्करांचे साखरा गावात बस्तान

प्रशासन निद्रावस्थेत

ग्रामपंचायतची भुमिका काय? 

रेती चोरांपेक्षा गैरकायध्याने रेती विकणारे दोषी नाही काय

वजनदार नेत्यांचा वरदहस्त

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लघुउध्दोजकापासुन तर उधोगपती सुद्धा लागले रेती चोरीच्या कामाला तालुक्यातील चुलबंद नदीच्या साखरा नदी घाटावरून कच्या रपट्याचे बांधकाम करुन रात्रभर रेतीचे ट्रक चालवून लाखो ब्रास रेतीचा उपसा बेछूटपणे बेलगाम पने केला जातो, तरीही येथील ग्रामपंचायतची भुमिका ही संसयास्पद असुन स्वताच्या स्वार्थासाठी गावाची मालमत्ता रेती तस्करांना सोबत हातमिळवनि करून रेती विक्रीचा गोरख धंदा साखरा गावात पाहायला मिळाला आहे जेव्हा ऩदिवर रपट्याचे बांधकाम करण्यात आले तेव्हा ग्रामपंचायत ची परवागी घेण्यात आली काय?तर मग ग्रामपंचायत ने कोनत्या निधितुन रपटा बांधकामकेला ईथे असे अनेक प्रश्न निर्मान होतात मग गावाच्या हद्दी मध्ये रपटा बांधकाम करुन अहोरात्र रेतीचा अवैद्ये उपसा करून सुरु असतांना ग्रामपंचायतनी महसुल विगाग आणि पोलीस विभाग यांना का?कळविले नाही? ईथे असे अनेक प्रश्न निर्मान होतात मग  यासाठी अभय कुणाचे?  हा सर्व सामान्यांना पडणारा मोठा प्रश्न ?आहे. काही राजकीय वजनदार नेत्यांच्या  नावाचा वापर  करुन  लेबल लावून, रेती चोरी करणे हा सर्व सामान्यांचा नव्हे तर आता मोठ्या उद्योगपतींचा धंदा झाला आहे. असेच चित्र लाखांदूर तालुक्यातील साखरा या ग्रामपंचायतच्या हद्दीत नदी मध्ये प्रत्यक्ष पाहायला मिळत आहे.मागील वर्षी पासुन नव्हे तर मागील  शासनकाळापासून ते आताच्या मिश्र शासन काळात सुद्धा रेती घाटाच्या लिलावाववर बंदी करून, मागचाच कित्ता गिरविताना दिसत आहेत, त्यामुळे  भंडारा  जिल्ह्यातील रेती घाट लिलाव प्रक्रियेवर जानुन बुजुन  शासनाची बंदी आणून एक प्रकारे जाणून अवैध धंद्यांना वाव देण्यात येत आहे. चुलबंद नदीतील शुभ्र रेती रेतीतस्करांसाठी खजिना ठरत आहे. आणि सोण्याच्या भावात टनाप्रमाने विकत असल्यामुळे साधारणतः संध्याकाळपासूनच सर्व रेतीचोरीच्या कामाला सुरवात होत असल्याचे स्थानिक लोक सांगतात. रेती घाट महसूल आणि खनिकर्म विभागाचे अखत्यारीत येत असले तरी  स्थानिक स्वराज्य   संस्था ग्रामपंचायतचे कर्तव्य आणि जबाबदारी काय असा प्रश्न निर्मान होत आहे.यावर  तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे सनियंत्रण असते , महसूल अधिकारी, तलाठी  पोलीस यांना या प्रकरणाची जाणीव आहे. मात्र आम्ही येतो  तुम्ही पळा असा देखावा  निर्माण करण्यात येऊन, संघनमताने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल शासनचेच अधिकारी बुडवीत असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. चुलबंद खोरे दुर्गम व अविकसित परिसर असल्यामुळे पूर परिस्थिती वगळता इकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दौरे होत नसल्यामुळे स्थानिक कर्मचाऱ्यांची चलती आहे चुलबंद रेती घाटातील रेती बारीक व पांढरी शुभ्र तथा उच्च प्रतीची असल्यामुळे सीमावर्ती जिल्ह्यातही मोठी मागणी आहे. पण रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे रेती तस्करांचा उदय झाला आहे. साखरा येथील रस्त्याने अवैध रेतीच्या ट्रॅकची  ओव्हर लोड वाहतूक सुरू असल्याने रस्त्याला ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना इतर लोकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. याकडे शासनाने लक्ष देऊन रेतीचोला मदत करणार्या अधिकार्यांनवर कार्य वाहीची मागणी साखरा येथील वपरिसरातील नागरीकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!