आयटकचा शताब्दी वर्ष महोत्सव समारोप कार्यक्रम संपन्न
राजुरा - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस( आयटक ) या कामगार संघटनेच्या स्थापनेला दिनांक 31 ऑक्टोबर 2020 ला रोजी शंभर वर्ष पूर्ण होत असून यानिमित्त सास्ती टाऊनशीप येथील संयुक्त खदान मजदूर संघाचे कार्यालयात समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात वेकोलीच्या समन्वय समितीचे सदस्य सी. जे. जोसेफ ,सुरक्षा कमेटी सदस्य श्रीनाथ सिंग, बल्लारपूर क्षेत्रीय आयटक अध्यक्ष मधुकर ठाकरे, दिलीप कनकुलवार,रायलेंगु झुपाका इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे.
या निमित्त 31 ऑक्टोबरला बल्लारपूर क्षेत्रातील सर्व कोळसा खाणीत ध्वजारोहण होणार असून व्यवस्थापक,वरिष्ठ अधिकारी व कामगार उपस्थित राहणार आहेत. आयटक ही देशातील एकमेव पहिली कामगार संघटना असून 21 ऑक्टोबर 2020 रोजी या संघटनेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. मागील वर्षी या दिवशी मुंबई येथे लाखो कामगारांनी या शताब्दी वर्षाचा शुभारंभ केला होता,परंतु कोरोणामुळे वर्षभर कार्यक्रम होऊ शकले नाही. संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळावा, यासाठी न्याय मिळवून देण्यात या संघटनेचा महत्त्वाचा वाटा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विविध कार्यक्रम हो णार आहेत.
आयटक या कामगार संघटनेचे पाहिले अध्यक्ष लाला लजपतराय होते. मुंबई येथे स्थापन झालेल्या या संघटनेचे कार्य संपूर्ण देशात आणि अनेक क्षेत्रात आहे. कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देऊन अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याचा या संघटनेचा इतिहास राहिला आहे. यानिमित्त बल्लारपुर क्षेत्रातील सात कोळसा खाणीसह अनेक कार्यालयापुढे ध्वजारोहण होणार असून मधुकर ठाकरे, दिलीप कनकुलवार, रायलिंगु झुपाका,रवी डाहुले,दिनेश जावरे, गणेश पावडे, पंकज झाडे, देवदास महाकालकर,गुलाब टेम्बुरणे,रवींद्र थेरे, ईश्वर गिरी, गंगाधर बोबडे, भाऊराव लांडे, विनोद देरकर, सोपरी संपत, विनय केसकर, ए.डी.नागदेवते, रमेश अंगुरी, रावल सिंग, मुरकुटे, तुकाराम ढवळे, दिलीप देरकर, गजानन धकाते,अनिरुद्ध मेश्राम, रवि व्यंकट यासह अनेक कामगार, कॉम्रेड कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!