सर्पमित्राकडून अजगर सापाला पकडून जीवदान
तळोधी बा.--(प्रतिनिधी)
तळोधी बा.वनपरिक्षेत्रअंतरर्गत येत असलेल्या आलेवाही बिटातील हस्तानपुर येथील संतोष कुंभरे यांच्या घरी दबा मारुन बसलेल्या ७ फुट लांबीच्या अजगर सापाला सावरगांव येथील वन्यप्रेमी व सर्पमित्र यंशवत कायरकर यांनी अजगर सापाला पकडून वनविभागाच्या सुरक्षित ठिकाणी सोडून जीवदान दिले.यावेळी वनविभागाचे वनरक्षक श्री .पी.एम.गायकवाड ,वनरक्षक श्री .एस.बी.पेंदाम, वनरक्षक
बायोलाजीस्ट श्री .राकेश आहूजा यांच्या उपस्थित अजगर सापाला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!