नितेश शेंडेला अभय देणाऱ्या तहसिलदार व कनिष्ठ लिपिकाची होणार तक्रार

फौजदारी कारवाईसह निलंबित करण्याची मागणी रेटून धरणार!

तालुका - प्रतिनिधी (केवलसिंग जुगी)

चिमूर : - गौण खनिज उत्खननाकडे दुर्लक्ष करून,वाळू-मुरुम व माती चोर माफीयांना,चिमूर तालुकातंर्गत महसूल-पोलिस-परिवहन विभागाद्वारे अभय देण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे.अशाच एका माती चोर प्रकरणाला अनुसरून,मौजा पारडपार येथील नितेश शेंडेला अभय देणाऱ्या तात्कालिन तहसीलदार संजय नागटिळक,कनिष्ठ लिपिक रवींद्र राठोड,व इतरांची जिल्हाधिकाऱ्यांसह,मुख्यमंत्री,महसूलमंत्री,वनमंत्री,आयुक्त यांच्याकडे पुराव्यानिशी येत्या सोमवारला तक्रारी करण्यात येणार आहेत.
तात्कालिन तहसीलदार संजय नागटिळक व सबंधीत कनिष्ठ लिपिक यांनी,वस्तूस्थितिवर आधारित असलेल्या सत्य तक्रारीकडे दुर्लक्ष केले.यावरुन लक्षात येते की,तात्कालिन तहसीलदार संजय नागटिळक व कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोड हे गौण खनिज चोरांना अभय देत होते.
          तहसीलदार संजय नागटिळक यांच्या बदलीनंतर सुध्दा,"वनविभागाच्या हद्दीतील जागे अंतर्गत विटा भट्टीसाठी हजारो ब्राश माती चोरणाऱ्या नितेश शेंडेला,कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोड आजच्या स्थितीतही अभय देण्याचे काम करीत आहे.
      हा कनिष्ठ लिपिक बनवाबनवीचे काम करीत असून,आताचे प्रभारी तहसीलदार  टि.एम.कोवे,यांच्या समोर सुध्दा वेळकाढूपणा अंतर्गत आपल्या कृतीचे दर्शन घडवितो आहे.
        या कनिष्ठ लिपिकाची बनवाबनवी असाह्य झाल्याने,आता तात्कालिन तहसीलदार संजय नागटिळक यांच्यासह,कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोड,यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची व शिस्त भंगातंर्गत निलंबनाची मागणी लेखी तक्रारीद्वारे करण्यात येणार आहे.
    मात्र,नितेश शेंडे यांच्या बेकायदेशीर माती चोरणाऱ्या गंभीर प्रकरणाचा मुद्दा तक्रारीत मुख्यत्वे असणार आहे.तद्वतच कनिष्ठ लिपिक रविंद्र राठोड भ्रष्टाचाराला कसा खतपाणी घालतो याचे सविस्तर विवरण तक्रारीत असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!