सेवानिवृत्त प्रोफेसर बबनराव डोहे यांचे पुण्यात निधन

सेवानिवृत्त प्रोफेसर बबनराव डोहे यांचे पुण्यात निधन 

प्रतिनिधी :  (चंद्रपूर)




       यवतमाळ निवासी सेवानिवृत्त प्रोफेसर बबनराव डोहे यांचे दि. १४.१०.२०२० रोजी  रात्रीला पुणे येथे  वृध्दपकाळाने निधन झाले.ते ८१ वर्षाचे होते. ते आपल्या मुलांकडे राहात होते. त्यांचे मुळ गाव चंद्रपूर जिल्ह्यातील कोलगाव (ता.राजुरा )  आहे. पण  ते  पदवी शिक्षणानंतर नोकरी च्या निमित्ताने यवतमाळला स्थायिक झाले होते. ते यवतमाळच्या  अमोलकचंद महाविद्यालयात प्राणिशास्त्र विषयाचे प्रोफेसर होते.मितभाषी, अभ्यासू आणि तितकेच साधे , स्वच्छ प्रतिमेचे व्यक्तिमत्त्व म्हणून  सर्वांना परिचित होते . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुलं, एक मुलगी , सुना आप्तपरिवार आहे.  त्यांच्या मार्गदर्शनात आणि संस्काराने मुलगा डाॕ. दिनेश , मुलगी डाॕ. वैशाली तथा प्रशांत हा अभियंता म्हणून सेवेत आहे. ते शिक्षण आणि वेळेला विशेष महत्त्व देत असे.  शेवटच्या काळात त्यांना स्मृती विस्मरण आजार  झालेला होता.  त्यामुळे ते लहान मुलांकडे वास्तव्यास गेले होते. आज पुण्यात त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!