विहिरीत पडून युवकाचा मृत्यू


गुरुदेव वार्डातील घटना

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चंद्रपूर : - चिमूर शहरातील प्रभाग क्रमांक. १३ मधील गुरुदेव वार्ड येथील हरणे यांच्या घरच्या विहिरीत पडून रवींद्र हेमराज निनावे वय ३५ वर्ष या युवकाचा आज दिनांक.१६ ऑक्टोबर २०२० ला सकाळी ०९:०० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला असून तो नवदुर्गा उत्सव व दिवाळी निमित्ताने रंगरंगोटी करीत असताना अचानक तोल सुटल्याने सरळ विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला.रवींद्र निनावे चिमूर येथील सोनेगाव बेगडे येथील रहिवासी आहे. मृतक चिमूर येथील हरणे यांच्या घरी आपल्या कुटूंबा सह किरायाने राहत होता. तो मजुरी काम करीत होता. आज दि १६ ऑक्टोबरच्या सकाळी ९ वा सुमारास नवरात्र निमित्ताने भवानी मातेचे मंदीरची रंगरंगोटी करण्यासाठी मंदिराच्या भिंतीवर चढला असता रंगरंगोटी चेनकाम करताना तोल सुटल्याने विहिरीत पडला. व आरडा - ओरड करण्यात आली परंतु मदतकार्य पोहचण्यापूर्वीच त्याचा विहिरीतच मृत्यू झाला. हि माहिती पोलीसांना दिली. पोलीस घटनास्थळी आल्यावर शव विहिरीतुन बाहेर काढुन शव विच्छेदन करण्यासाठी उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले.व पुढील तपास पी.एस.आय.अलीम शेख करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!