नागभिड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या धानपीकाची तात्काळ चौकशी करावी.
नागभीड : ( यश कायरकर)
नागभिड तालुक्यातील शेतकरी मावा तुळतुळा या धानपीकाच्या रोगामुळे हवालदील झालेले आहेत. तालुक्यातील बहूतांश गावातील शेतकरी मावा तुळतुळा या रोगाला बळी पडलेले आहेत. हातात आलेला पीक जानार या भिती पोटी कीतेकाने हीम्मत सोडलेली आहे. धानावर हजारो रुपयाची औशधी फवारनी करुनही धानपीक हातात येनार याची कुनालाही शास्वती राहीली नाही. दर वर्शी पेक्षा या वर्शी दूप्पट, तीनपट खर्च करावा लागत असुनही पीक मीळेल हे कोनीही सागुच शकत नाही. या वर्शीच्या पावसाळी हंगामाला अकुशल वातावरनाचा बराचसा सामना करावा लागत आहे. सोयाबीन, कापुस, कीवा धान पीक हे पीक घेनाऱ्या संपुर्न शेतकऱ्याची अवाढव्य नुक्सान झालेली आहे. मात्र त्या शेतकऱ्यांकडे कोनीही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत त्या शेतकऱ्याने पाहव तरी कुनाकडे. खास करुन घोडाझरी तलावाच्या ओलीत शेतकऱ्यावर तर आत्महतेतीच वेळ आल्यासारखी वाटायला लागली आहे. एकीकडे कोरोनाच्या लाकडाउनमुळे जनतेवर तशीही उपासमारीची वेळ आली होती. आनी आता कर्ज काढून पीकवलेली शेती जरी हातातुन गेली तर त्यांनी काय कराव. कर्ज कसं फेडायचं, मुलांच शीक्षन कस करायच, खायचं काय आनी वीकायचं काय. या महा संकटात सापडलेला शेकतरी राजा आज आत्म हतेच्या दारात उभा आहे. काय कराव कुनाला मदत मागावी. हे त्याला कडेनासं झालेलं आहे. शेतकरी हवालदील झालेला आहे. काही गावतील काही शेतकऱ्यांनी हातात येईल तेवढा पीक कापुन टाकला. परंतु त्या सडलेल्या मालाचा मोबदला त्याला कोनत्या आधारावर मीळेल. त्याची चौकशी जर झालीच नाही तर त्याला काहीच मीळनार नाही. म्हनुन आधी चौकशी व्हायला पाहीजे. हे कळताच बहूजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीचे चीमुर विधानसभा अध्यक्ष निकेश रामटेके यांनी ईलाख्यातील पटवारी साहेब. क्रृशी अधीकारी साहेब. यांना तात्काळ चौकशी करुन वरीस्ठाना माहीती देन्यास सांगीतले. परंतु आम्हाला वरीस्टकडुन आर्डर आल्याशीवाय आम्ही काहीच करु शकत नाही असी माहीती त्यांनी दीली असता निकेश भाऊंनी तात्काळ मा. मुख्यमंत्री साहेब मंत्रालय मुंबई, मा. क्रृशीमंत्री साहेब मंत्रालय मुंबई. मा. पालकमंत्री साहेब चंद्रपुर आनी मा.जील्हाधीकारी साहेब चंद्रपुर यांना तहसीलदार साहेब नागभिड यांच्या मार्फतीने निवेदने देवुन तात्काळ चौकशीचे आर्डर द्यावे आनी शेतकऱ्यांना आर्थीक मदत तात्काळ करावी असी मागनी केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!