कृषी विभागाचा उपक्रम : लाभ घेण्याचे तालुका कृषि अधिका—याचे आवाहन शेतक—यांसाठी यांत्रिकीकरण उपअभियान योजना
कृषी विभागाचा उपक्रम : लाभ घेण्याचे तालुका कृषि अधिका—याचे आवाहन
शेतक—यांसाठी यांत्रिकीकरण उपअभियान योजना
मूल : (प्रमोद मशाखेत्री)
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानातंर्गत कडधान्य व भात गळित धान्य या योजनेत सन 2020—2021 या आर्थीक वर्षासाठी यांत्रिकीकरण उपअभियान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी लाभ घेण्याचे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.
शेतक—याची आर्थिक उन्नती व्हावी,यासाठी कृषी विभागातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्याअनुषंगाने यांत्रिकीकरण उपअभियान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत डिझेल पंपसंच व समर्सिबल पंपसंचासाठी अनुदान मर्यादा एकूण किंमतीच्या 50 टक्के किंवा रूपये दहा हजार यापैकी जे कमी असेल ते लागू राहील. शेतक—यांसाठी शेततळयासाठी अनूदान मर्यादा मागेल त्याला शेततळे योजनेच्या मापदंडाप्रमाणे आहे.
पाईपसाठी किंमतीच्या 50 टक्के किंवा पाइपच्या प्रकारानुसार उच्चतम रूपये 40 ते 50 प्रति मीटर मर्यादा तर कॉटन श्रेडरसाठी मापदंडाप्रमाणे लागू राहील.तर शेतकरी गटाकरीता मोठी राईस मिलसाठी दोन लाख रूपये किंमतीच्या 60 टक्के लागू असणार आहे. योजनेच्या लाभासाठी आॅफलाईन अर्ज तालुकास्तरावर मागविण्यात आले आहे.
शेतक—यांनी 2 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्यासाठी संबंधीत तालुका कृषी अधिका—यांशी संपर्क साधावा, अशी माहिती तालुका कृषि अधिकारी यांनी दिली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!