मासळ येथील उपोषणाची सांगता

उपोषणकर्त्याना पाचव्या दिवशी बालू चुन्ने यांच्या प्रयत्नाने मिळाली हमाली रक्कम

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लाखांदूर पंचशील सहकारी धान्य गिरणी मासळ येथील हमाल भैय्या शिवणकर, ऋषी मटाले केशव माटे यांच्या 14 हमाल बंधू नी केलेल्या कामाचा मोबदला मिळावा म्हणून 23 तारखे पासून उपोषण ला सुरवात केली.आज पाचव्या दिवशी उपोषण कर्त्या पैकी एकाची प्रकृती खालवल्या ची माहिती राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बालूभाऊ चून्ने यांना मिळताच उपोषण मंडपाला भेट देऊन तब्येतीची विचारपूस करून मागणी बाबत जाणून घेऊन सदर संस्थेचे अध्यक्ष श्री. हरगोविंद नखाते व संचालक यांच्या सोबत चर्चा करून तात्काळ 34793 क्विंटल धान्याची हमाली चार रुपये दराने 139172 रुपये व टेंडर चे 5000 रुपये नगदी स्वरूपात उपोषण कर्त्याना देण्यास भाग पाडले. उपोषण कर्त्यांचा समाधान झाल्यानंतर सदर उपोषणकर्याना निंबू पाणी देऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस युवक उपाध्यक्ष मंगेश ब्राम्हणकर उपोषण धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्याप्रसंगी सेवादल अध्यक्ष बबन पीलारे,व्यवस्थापक बगमारे ,दिघोरे ,ग्रेडर व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!