हिरापूर येथील जि.प.शाळेचा गुणात्मक दर्जा सुधारणार

शिक्षकाची जबाबदारी वाढणार

भौतिक,शैक्षणिक प्रशासकीय सुविधा राहणार

शंकरपूर - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

शंकरपूर : - शंकरपूर येथून जवळच असलेल्या हिरापूर येथील जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित होणार राज्यातील विविध जिल्हा परिषद शाळा पैकी ३०० आदर्श शाळा म्हणून विकसित होणार आहे. त्यात चिमूर तालुक्यातील हिरापूर शाळेचा समावेश झालेला आहे. शालेय शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने आदर्श शाळा निर्मितीसाठी तीन निकष ठरविण्यात आलेले आहे त्यात भौतिक गुणवत्ता आणि प्रशासकीय बाब समोर ठेवून ती शाळा विकसित करण्यात येणार आहे.भौतिकते मध्ये शाळेचे क्रीडांगण शौचालय पाण्याची व्यवस्था शाळेची इमारत आदी बाबींचा विचार करण्यात येत आहे तर गुणवत्तेमध्ये ग्रंथालय शैक्षणिक साहित्य आधीचा विचार होणार आहे तर प्रशासकीय बाबी मध्ये तेथे विद्यार्थ्यांना शिक्षक वर्ग आहे. त्यांची पाच वर्षे तिथे नोकरी करण्याची टाकण्यात आलेली आहे. यासोबतच आदर्श शाळा निर्मितीसाठी शिक्षणाच्या बाहेर जाऊन विद्यार्थ्यांच्या कला कौशल्याचा वाव मिळावा विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण संपन्न व्हावे विद्यार्थी दप्तराच्या ओझ्याखाली न राहता आदर्श शिक्षण प्रणाली अवलंबावी व स्वतःचा विकास घडवून आणावा यासाठी आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहे.वरील सर्व गुण हिरापूर येथे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेमध्ये असल्याने चिमूर तालुक्यातून या शाळेची निवड करण्यात आलेली आहे.त्यामुळे आता ग्रामीण भागातील विद्यार्थी नव्याने विकसित होण्याचे चिन्ह दिसत आहे हिरापूर येथील जिल्हा परिषद शाळेत १४२ विद्यार्थी आहे या सर्व विद्यार्थ्यांचा गुणवत्ता पूर्ण विकास करणे हे आता आमचे लक्ष राहणार आहे आदर्श शाळे मध्ये नाव समावेश झाल्याने आमच्या जवाबदारी वाढल्या आहेत त्या जवाबदारी सक्षम पणे पार पाडू अशी माहिती अशोक गायकवाड मुख्याध्यापक जि.प. शाळा हिरापुर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!