तालुका आरोग्य अधिकार्यांचा अभिनव उपक्रम


तालुक्यातील किन्ही /गुंजेपार येथे माजी सरपंच उत्तम भागडकर यांच्या संकल्पनेतुन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांच्या कडुन कोरोणा टेस्ट व कोरोणा रोगाविषयी जनजागृती
करण्यासाठी मार्गदर्शन शिबीर पार पाडण्यात आला
    
भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लाखांदूर तालुक्यात कोरोणा पिडीत रुग्णाचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहेत आणि ग्रामीण नागरीकांत कोरोणा रोगाविषयी खुप दहशत व भीतीचे वातावरण असल्याने ग्रामीण भागातील नागरीक कोरोणा टेस्ट करुन घेण्यासाठी पुढे येतांना दिसत नाहीत. असाच प्रकार मौजा किन्ही/गुंजेपार येथे तिन पाजेटिव्ह रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे त्या गावामध्ये आणखी नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे गुजेपार/किन्हि येथील  माजी सरपंच उत्तम भागडकर यांच्या संकल्पनेतून तालुका आरोग्य अधिकारी डॉ नलिनीकांत मेश्राम यांच्या कडुन तेथील नागरीकांना कोरोणा रोगाला घाबरुन न जाता आपली कोरोणा टेस्ट का आवश्यक आहे. याविषयी मार्गदर्शनात  ते म्हणाले की, जर आपली तब्बेत बिघडली असतांनाही आपल्याला अलगीकरणात रहावे लागेल, माझ्या घरच्यांना अलगीकरणात रहावे लागेल या भीतीने आपण कोरोणा टेस्ट टाळतो व आपण खाजगी दवाखान्या कडे वळतो. यात आपल्यामुळे आपल्या घरच्यांना व गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊन संसर्ग वाढण्याची शक्यता सर्वात जास्त असते. त्यामुळे आपण कोणताही विचार न करता आपली कोरोणा टेस्ट अवश्य करुन घेणे गरजेचे आहे. समजा आपली टेस्ट वेळेत झाली आपण नेहमी मास्कचा वापर व सोशल डिस्टंस चे पालन केले तर इतरांना संसर्ग होण्यापासुन आपण वाचवु शकतो व आपलेही आरोग्य लवकर दुरुस्त होतो. याविषयी अत्यंत सुंदर अशा ग्रामीण भाषेत डॉ.मेश्राम यांचे म्हणने लोकांना पटले व तेथील नागरिकांनी उद्या दिनांक (१५) पासुन कोरोणा टेस्ट कॅम्प लावण्याचे आग्रह केले.यावेळी सार्वजनिक देवस्थानचे अध्यक्ष तिलक शहारे, पोलीस पाटील धनलता दाणी, ग्राम सेवक लिल्हारे, मुख्याध्यापक हटवार, चांदेवार मॅडम, अंगणवाडी सेविका ज्योती चिरवतकर, आशा सेविका जया नंदागवळी, उपसरपंच दिलीप दाणी, स्वयंसेवक कोमल दाणी, शुभम चिरवतकर, मंगेश प्रधान, नानाजी राऊत, सुलेचंद दाणी, लेकराम भागडकर, भुषण चिरवतकर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!