बांबू पुरवठा करण्याची बुरड कारागिरांची मागणी

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगांव (पिपर्डा) : - पळसगांव वनपरिक्षेत्रातील बुरुड कारागिरांना जीवन जगण्या करिता डेपो मध्ये बांबू उपलब्ध करून देण्याची मागणी असून पळसगांव येथील डेपो मध्ये बांबू नसल्यामुळे ठणठणाट निर्माण झाला असल्याने गाव परिसरातील  गावात बांबू मिळणे कठीण झाले आहे.या पूर्वी बुरड समाजाकरिता बांबू पुरविला जात होता.त्यामुळे जंगलाच्या चोरीवर आळा घालणे हा मुख्य उद्देश होता.मात्र मागील कित्येक महीण्यापासून बांबू डेपोमध्ये उपलब्ध होत नसल्यामुळे जनतेमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.परिसरात बांबू पासून साहित्य बनविणारा बुरड व अन्य आदिवासी समाज मोठया प्रमाणात त्या व्यवसायावर उपजिवीका साधतात. डेपो मध्ये बांबू मिळत नसल्याने व्यवसायाचा प्रश्न निर्माण होत आहे.एखादया व्यक्तीच्या मृत्यू पश्चात जी क्रिया केली जाते, त्या अंत्यसंस्काराकरिता तिरडीकरिता बांबू मिळणे डेपो मधून मिळणे कठीण झाले असल्याने संबंधित विभागाप्रती रोष व्यक्त केल्या जात आहे. हेच का शासन व प्रशासनाचे जनतेप्रतीचे "अच्छे दिन" म्हणण्याची पाळी आज जनतेवर आली आहे.तरी संबंधित वनविभागाणी बांबूचा मुबलक पुरवठा करण्याची मागणी नागरिकांत जोर धरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!