मूलची अवंती गांगरेड्डीवारने घेतली राज्यपालांची भेट

मूलची अवंती गांगरेड्डीवार यांनी घेतली राज्यपालांची भेट

मूल (अमित राऊत)


अंतरराष्ट्रीय स्काॅय  मार्शल आर्ट खेळाडू अवंती अनिल गांगारेड्डीवार हिने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निमंत्रण स्वीकारून नुकतीच राजभवन मुंबई येथे त्यांची भेट घेतली.
       या भेटीदरम्यान अवंती चंद्रपूर जिल्ह्याच्या खेळांमधील विविध समस्याबाबत तब्बल अर्धा तास चर्चा केली. राज्यपाल यांची राजभवनामध्ये भेट घेणारी अवंती  चंद्रपुरातील पहिलीच खेळाडू ठरली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या भेटीचे निमंत्रण स्वीकारून स्काॅय मार्शल आर्टमधील विविध संधी व विकास याबद्दल सुद्धा चर्चा केली.
        या भेटीमध्ये अवंती ने चंद्रपूर तथा गडचिरोलीत खेळांच्या विविध सोयी सुविधा निर्माण करण्यात यावे, या मागणीचे निवेदन केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजीजु यांना देण्यात आले.


           भेटी दरम्यान अवंतीचे प्रशिक्षक संदिप पेदापल्ली, महाराष्ट्र स्काॅय असोसिएशनचे अध्यक्ष मजहर खान, राष्ट्रपती पुरस्कार विजेती एंजल देवकुले, आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!