बॅकेसमोर गर्दीमुळे सोशल डिस्टन्शिंगचा फजा

     बॅकेसमोर गर्दीमुळे सोशल डिस्टन्शिंगचा फजा

मूल : प्रतिनिधी 



            निराधारांना आधार व्हावा यासाठी राज्य सरकार संजय गांधी योजना,श्रावनबाळ योजनेअंतर्गत 1 हजार रूपये दिल्या जाते. वृद्धांना श्रावनबाळ योजना आणि विधवा महिलांना संजय गांधी निराधार योजना या योजनेअंतर्गत आर्थिक मदत शासनाकडुन पुरविल्या जात आहे. 

       असे असतांना दर महिण्याला पेन्शन नियमित होत नाही. पंधरा दिवसाकडे दिवाळी असतांना 3 महिण्याचा पेंन्शन बॅकेत जमा करण्यात आला. त्यामुळे मूल येथिल महाराष्ट्र बॅंकेत निराधार महिला व पुरूषांनी गर्दी केली आहे. 


     कोरोनाचा प्रादुर्भाव मूल शहरात असतांना बॅंकेेत व बॅंकेच्या बाहेर सोशल डिस्टन्शिंग न ठेवता रांग लागलेली दिसुन आली. बॅंकेच्या बाहेर वृद्धांना उन्हात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे पेंडाल लावण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे नागरीकांकडुन बोलल्या जात आहे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!