पुर बाधित शेतकऱ्यांची विहीरीत उडी घेऊन आत्महत्या

चप्राड येथील घटना

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील चप्राड येथील एका पुर बाधित शेतकऱ्यांने चौकातील सार्वजनिक विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि. १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ सुमारास घडली असून, दुधराम राघोजी ढोरे वय ५० वर्ष असे मृतकाचे नाव आहे.
   
     मृतक दुधराम यांच्याकडे पाच एकर शेती असून, दोन भावांमध्ये वाटप करण्यात आली आहे. त्यात दुधराम यांच्या हिस्स्यावर एक हेक्टर शेती आली असून, शेतीवर जिल्हा बँकेच्या कर्जाचा बोझा दर्ज करण्यात आला आहे. दरम्यान आँगस्ट महिण्यात आलेल्या भिषण महापुरामुळे संपुर्ण एक हेक्टर क्षेञातील शेतीचे पुर्णतः उदध्वस्त झाल्याने मृतकावर कर्जाची परतफेड आणि कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता.
     
       त्यामुळें मृतक मागिल आठ ते दहा दिवसापासून अनेक प्रकारच्या विचारांमध्ये गुरफटून मानसिकरित्या ञस्त झाले होते. शासनाकडून मदतीची अपेक्षा करत असतांना पुर बाधित शेतकऱ्यांकरीता शासनाने तूटपुंजी मदत जाहीर केल्याचे कळताच शेवटी काहीच सुचेनासे झाल्याने मृतक दुधराम यांनी गावातील गांधी चौकातील सार्वजनिक विहीरीत उडी घेऊन आपली जिवनयाञा संपविली आहे.

     त्यांच्या पश्चात अभिषेक वय २१ वर्ष, मोहित वय १८ वर्ष अशी दोन मुले व पत्नी महानंदा असा आप्त परीवार आहे. मृतक दुधराम ढोरे यांचे सामाजिक व राजकीय क्षेञात मोठे योंगदान असल्याने त्यांच्या एकाकी दु:खद निधनामुळे चप्राड गावात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!