महसुल विभागाचे फिरते पथक झाले गाहाळ तर रेती तस्करांचे फुलले बाहार

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमूर : - चिमुर तालुक्यातील महसुल विभागाचे फिरते पथक गाहाळ झाल्याचे दिसुन येत अाहे,त्यामुळे रेती तस्करांचे बाहार फुलल्याचे सर्वत्र दिसुन येत आहे.
चिमुर तहसिलच्या अधिकाऱ्यांनी रेती तस्करी रोखण्यासाठी फिरते पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.व फिरते पथकानी सुध्दा आठ ते दहा दिवस आपला चांगलाच रंग दाखवला आणि त्या नंतर हळू-हळू गाहाळ झाले.अचानक फिरते पथक व रेती तस्कर यांबरोबर हात मिळवणी झाल्याची चिमुर तालुक्यात सध्या चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगली आहे. त्यामुळे चिमुर,नेरी,भीसी,शंकरपुर परीसरात रेती तस्करी दिवस व रात्रो ला जोरात सुरू झाली आहे. रेती ही रॉयल्टी पेक्षा महागडी टाकण्यात येत अाहे.घरकुल धारकाना किंवा सामाण्य लोकांना घर बांधकामासाठी मोठ्या अडचणी येत अाहे.याची प्रशासनानी योग्य त्या प्रमाणात दखल घेऊन हि अवैध रेतीची तस्करी थांबवावी व तस्करावर कार्यवाही करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी जनता करीत अाहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!