चिमूर शहरात मच्छरांचा हैदोस

मलेरियाचा प्रसार होण्यास टाळता येणार नाही 

नगर परिषद चिमूर यांचे यापासून दुर्लक्ष का ?

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चंद्रपूर : - कोरोना या रोगाने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातला असून लाखो रुपये कोरोनाच्या जनजागृतीवर खर्च केल्या जात आहे. नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छतेच्या नावाखाली घाणीचे साम्राज्य बघावे त्या ठिकाणी निर्माण झाले आहे. चिमूर शहरवासीय जनतेला खाजेचे रोग स्किन डिसिस चे प्रॉब्लेम त्वचेचे रोग , कॉलरा , टाईफाइड , यासारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे कित्येकदा नगरसेवक मुख्याधिकारी आणि प्रशासकीय कर्मचारी यांना याबाबतच्या विविध तोंडी तक्रारी केल्या असताना वारंवार याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. व अशा आजारांच्या तक्रारी घेऊन दवाखान्यात गेले असता डॉक्टर कोरोना या रोगाची तपासणी करावयास सांगत असतात यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे समोर अशा प्रकारामुळे जनतेचे आरोग्य बिघडून मृत्यूस आमंत्रण देण्याचे टाळता येणार नाही तरी प्रशासनाने गांभीर्याने याची दखल घेऊन योग्य त्या प्रकारे गावामध्ये ठिकठिकाणी तसेच शहरांमध्ये ठिकठिकाणी मच्छरांची फवारणी केरकचरा तसेच जंतू नाशक औषधांची फवारणी करावी अशी चिमूर शहरवासीयांनकडून मागणी जोर धरू लागलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!