ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात ३ वाघिणीचे बछडे आढळले अशक्त अवस्थेत
चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात उपचारासाठी नेतांना एका बछड्याचा मृत्यू तर दोन बछड्यांवर उपचार सुरू
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चंद्रपूर : - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गतचे बफर क्षेत्रातील खडसंगी वनपरिक्षेत्र, उपक्षेत्र खडसंगी, नियतक्षेत्र खडसंगी-३, कक्ष क्र. ५३ मध्ये दि. २७/१०/२०२० रोजी गस्तीदरम्यान क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना तीन बाधिणीचे बछडे अशक्त स्थितीत आढळले. तेथील क्षेत्रीय कर्मचारी यांनी सदर तीन वाघाच्या बछड्यांचा मागोवा घेणे सुरु केले. दि.२८/१०/२०२० रोजी त्यापैकी एक बछडा अत्यंत अशक्त स्थितीत आढळल्याने त्याला उपचाराकरिता चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्र (Transit Treatment Centre) येथे आणतांनी त्याचा मृत्यु झाला. तदनंतर राष्ट्रीय ख्याघ्र संरक्षण प्राधिकरण (NTCA) यांनी दिलेल्या SOP नुसार दि.२९/१०/२०२० रोजी त्याचे शवविच्छेदन करुन दहन करण्यात आले. तसेच दि. २९/१०/२०२० रोजी इतर दोन वाधाचे बछडे अशक्त स्थितीत आडळून आल्याने त्यांना सुद्धा उपचाराकरिता चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्र (Transit Treatment Centre) गेले आणण्यात आले. असून सध्या त्यांच्याचर उपचार सुरु आहे. खडसंगी बनपरिक्षेत्राअंतर्गतचे क्षेत्रीय कर्मचारी व बिशेष व्याघ्र संरक्षण दल यांचे मार्फत त्या तीन बछड्याच्या आईचा (वाघीण) शोध घेणे सुरु आहे. सदर कार्यवाही उपसंचालक (बफर) व सहाय्यक वनसंरक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!