स्वतःचे पाप लपविण्यासाठी डॉक्टरांनी मृतकाच्या पत्नीची दिली खोटी तक्रार

लाखांदूर पोलीस स्टेशन मध्ये मृतकाच्या पत्नी विरोधात खोटा गुन्हा दाखल

मृतकाच्या मलाचा आरोप

भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )

भंडारा : -  भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील विष्णू गुरुने नामक व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असताना येथील डॉक्टरांनी त्याच्या कुटुंबीयांना भंडारा येथे हलविण्यास सांगितले कुठलेही वाहन न मिळाल्यामुळे डॉक्टरांनी रुग्नाला घरी घेऊन जाण्याचा तोंडी सल्ला कुटुंबीयांना दिली त्यामुळे  कुटुंबीयांनी रुग्णाला घरी घेऊन गेले यातच दिनांक २९ सप्टेंबर रोजी लाखांदूर येथे रुग्णांची राहते घरी मृत्यू झाल्यामुळे आरोग्य विभागामध्ये एकच खळबळ उडाली आपले पाप लपविण्यासाठी आरोग्य विभागाच्या डॉक्टरांनी  मृतकाच्या पत्नी विरोधामध्ये लाखांदूर पोलीस स्टेशन मध्ये खोटी  तक्रार दाखल करून खोटे गुन्हे दाखल केले आहेत असा आरोप मृतकाच्या मुलांनी केला आहे डॉक्टरांनी आपले पाप लपवुन घेण्याकरिता आपली जबाबदारी झटकून खोट्या आरोपाखाली मृतकाच्या पत्नीवर गुन्हे दाखल करून अन्याय केला आहे संबंधित आरोग्य विभागातील डॉक्टरांना निलंबित करून न्याय मिळवून देण्याची मागणी मृतकाच्या मुलांनी  व लाखांदुर वासियानी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!